Alandi : आळंदीमध्ये श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत

एमपीसी न्यूज : आळंदी येथे श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव (Alandi) 21 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. त्या निमित्ताने ग्रामदेवतेच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भैरवनाथ चौकात भव्य मंडप व कमान उभारण्यात आली आहे.

आज 20 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता श्री पीरबाभनभाई यांचा संदलाचा पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी यज्ञ सोहळा, श्रींचा अभिषेक इ. धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त भव्य बैलगाडेचे श्री भैरवनाथ महाराज उत्सव मंडळ समस्त आळंदीकरांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

PCMC : बॅडमिंटन स्पर्धेसाठी महापालिकेने दिले 20 लाख रुपये

प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांकाच्या गाड्यांस विविध बक्षिसे ठेवण्यात आली (Alandi) आहेत. त्यामध्ये रोख रक्कम जुंपता गाडा, दुचाकी, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, कुलर, टेबल फॅन, भव्य चषक इ. समावेश आहे. तसेच, वैयक्तिक बक्षीसामध्ये चांदीची ढाल,चांदीची गदा व रोख रक्कमेचा समावेश आहे. दि.22 फेब्रुवारी रोजी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कोव्हिड योद्धे सत्कार आयोजित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.