Pune : मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे (Pune) यांच्या मुलाचे बनावट विवाह केल्याचे सर्टिफिकेट बनवून 30 लाख रूपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश वसंत मोरे (वय 25 रा.कात्रज गावठाण) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश यांच्या व्हॉटसअपवर मेसेज आला की, हमने आपके नाम का मॅरेज का सर्टिफिकेट बनाया है, खराडी आयटी पार्क के सामने इनोव्हा मे 30 लाख रुपये रख देना, पोलीस कम्प्लेंट किया और इनोव्हा सील हुआ तो देख लेना क्या करते है आपके साथ, और पुलीस कम्लेंट करके कुछ नही होने वाला, इम्तियाज चाचाने पहले से सब सेटींग करा है, पुरी चंदननगर पोलीस स्टेशन मॅनेज कर दी है.” असा धमकीचा मेसेज पाठविण्यात आला.

Pune News : पुण्यात होणाऱ्या 32 व्या पीएसपीबी इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत 22 ग्रँडमास्टर्स, 6 महिला ग्रँडमास्टर्सचा सहभाग

त्यावर फिर्यादी रुपेश मोरे यांनी दुर्लक्ष करत ओके म्हणून रिप्लाय दिला. त्यानंतर कोणाचा फोन किंवा मेसेज आला नाही. पण, त्यानंतर (Pune) तुला पैसे देण्यासाठी यावे लागेल. अशा मजकूराचे मेसेज फिर्यादी रुपेशला 7 फेब्रुवारी 2013 ते आज अखेर येत राहिले. त्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली. अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसानी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.