Pune : बुरा ना मानो होली हे म्हणत विरोधकांनी लावला एकमेकांना रंग

एमपीसी न्यूज : एकमेकांच्या नेहमी विरोधात असणाऱ्या (Pune) भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आज धूलिवंदन सणानिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे नेते दत्ता भरणे आणि भाजपचे आमदार भीमराव तपकीर यांनी आज सकाळी मॉर्निंग वॉकवेळी एकमेकांना रंग लावून धूळवड साजरी केली.

भरणे आणि तपकिर दोघेही मॉर्निंग वॉकवेळी तळजाई टेकडी येथे भेटले. दोघांनीही आपल्या कार्यकर्त्यासोबत एकमेकांना रंग लावला. राजकीय मतभेद बाजूला सारून या दोघांनीही बुरा ना मानो होली हे म्हणत रंगपंचमी साजरी केल्याचे पाहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.