Maharashtra : महाराष्ट्रात वाढत आहेत न्यूमोनियाचे रुग्ण; कबुतरांमुळे होतोय का हा आजार?

एमपीसी न्यूज : न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या आजाराचे (Maharashtra) रुग्ण महाराष्ट्रात सातत्याने वाढत आहेत. या आजाराला कबुतर जबाबदार असल्याचे मानले जात असून कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे हे आजार पसरत आहेत. एवढेच नाही तर ठाण्यातील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबुतरांना खाऊ घालण्याचा इशाराही दिला आहे.

कबुतरांच्या विष्ठेमध्ये आढळणारे बॅक्टेरिया आणि बुरशी फुफ्फुसात जळजळ होऊ शकते. एवढेच नव्हे तर फुफ्फुसांना पूर्णपणे नष्ट करू शकतात. ठाणे महानगरपालिका किंवा टीएमसीनेही अलीकडेच या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी शहरात अनेक पोस्टर्स लावले आहेत.

Pune : बुरा ना मानो होली हे म्हणत विरोधकांनी लावला एकमेकांना रंग

टाईम नाऊ न्यूजमधील बातमीनुसार, ठाणे महापालिकेने लावलेल्या या पोस्टर्समध्ये  (Maharashtra) कबुतरांना खायला दिल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या काही शहरांमध्ये आजकाल अतिसंवेदनशील न्यूमोनियाची प्रकरणे वाढू लागली आहेत. यामागे कबुतर हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.