Pune Dengue Cases: पुणे जिल्ह्यात डेंगीचे सर्वाधिक रुग्ण, डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला लक्षात ठेवा

एमपीसी न्यूज: राज्यात सध्या डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जून अखेर पर्यंत राज्यात 1146 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. (Pune Dengue Cases) यामध्ये सर्वाधिक 305 रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात सर्वाधिक डेंगीचे रुग्ण असले तरीही यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. ही एक दिलासा देणारी बाब आहे. मात्र तरीही डॉक्टरांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. 

 

पुणे जिल्ह्यात डेंगीचे 305 रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक 147 रुग्ण हे पुणे शहरात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी चिंचवड मध्ये 27 आणि पुणे ग्रामीण मध्ये 137 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर तर तिसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग आहे.

 

दरम्यान सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात आढळल्याने पुणे महापालिकेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. डेंगी आटोक्यात येण्यासाठी पुणे महापालिकेने यावर्षी कीटक प्रतिबंधक विभागाने 470 सोसायटी व व्यावसायिक इमारतीना डेंगी डासांची उत्पत्ती झाल्या प्रकरणी नोटीस दिली आहे.

 

पावसाच्या दिवसात रिकाम्या जागी पाणी साचते. पाणी साचल्यानंतर बहुतांश वेळा डासाची उत्पत्ती होते. (Pune Dengue Cases) त्यामुळे घरात, फुलझाडांच्या कुंडीच्या तळाशी, पाण्याच्या उघड्या टाक्यांमध्ये, टायर मध्ये पाणी साचू देऊ नये. दरम्यान महानगरपालिकेने ही याबाबत धूरूफवारणी सुरू केली असून नागरिकांनीही आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून खबरदारी घ्यावी असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.