Pune : कसबा आणि सोमवार पेठ भागात अन्नधान्य किट वाटप करा : सदानंद शेट्टी

Distribute food kits in Kasba and Somwar Peth areas: Sadanand Shetty

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कसबा – सोमवार पेठ या कोरोना संक्रमण प्रभाग 16 मध्ये अन्नधान्य किट वाटप करण्यात आले नाही. ते लवकर करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केली आहे.

या संदर्भात शेट्टी यांनी कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय आयुक्त महादळकर यांना निवेदन दिले आहे. कोरोना संक्रमणामध्ये प्रभागांमधील झोपडपट्टी भागांमध्ये अन्नधान्य किट वाटप करण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये बहुतांशी लोकांकडे अन्नधान्य किटचे पास असून देखील त्यांना अन्नधान्य किट मिळालेले नाही. ते लवकरात लवकर देण्यात यावे.

त्याचबरोबर कसबा पेठ, कागदी पुरा, भुईआळी याठिकाणी अन्नधान्यचे पास देण्यात आलेले नाहीत. त्या ठिकाणीही अन्नधान्य किट द्यावेत, अशी मागणी शेट्टी यांनी निवेदनात केली आहे.

प्रभागांमध्ये समस्त नागरिकांना आर्सेनिक टॅबलेट वाटप करण्यात यावे. कोरोनाचे पेशंट नसतील तेथील रस्ते खुले करण्यात यावे. प्रभागातील विकास कामे सध्या बंद आहेत, तीही सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच प्रभागातील सर्व शौचालय सॅनीटाईज करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी गोविंदराव साठे, प्रशांत प्रभाकर म्हस्के, मंगेश भरत साखरे, गफारभाई शेख, राजूभाई शेख, श्रीकांत शेंडगे, अक्षय गायकवाड, बबलू सय्यद, राकेश जगवानी, मोहम्मदभाई शेख, अमरसिंह शामराव पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.