Pune : फडणवीसांच्या, आगे आगे देखो’मध्ये भाजप’च्या स्वार्थी विकृती’ची बिजे-गोपाळ तिवारी

“विरोधी नेत्यांना पायघड्या हाथरुन, प्रतिपक्ष कमजोर करण्याचा अनैतिक व असंविधानीक प्रयत्न, ही राजकीय विकृतीच्”-गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – कर्तबगारी पेक्षाही ऊथळ भाषणजीवी व श्रेयजीवी (Pune )नेतृत्व लाभलेल्या BJP अर्थात भ्रष्टाचार जुळवून घेणाऱ्या पार्टी ला ‘स्व-सत्ताकाळाच्या कार्य_कर्तुत्वावर’ मतें मागणे अशक्य झाल्यानेच, ‘सत्तेत पुन्हा येण्याच्या लालसे पोटी’ विरोधीपक्ष कमजोर करण्याचे स्वार्थी व लोकशाही विरोधी प्रयत्न भाजपचे चालू असून ‘विनासायास सत्तेत रहाण्याचे मनसुबे’ भाजप रचत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.

जनतेचा दुसरा पर्याय असलेल्या प्रतिपक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे (Pune )आरोप करायचे व तदनंतर ‘भ्रष्टाचाराचे आरोप बासनात गुंडाळून, त्यांना पायघड्या टाकुन ‘त्यांचे वाटेकडे डोळे लाऊन बसायचे’, हा भाजपचा कोणता ‘सत्तालोलुप राजकीय पुरषार्थ’ आहे(?) असा खोचक सवालही तिवारी यांनी उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे माजी मुख्यमंत्री स्व. शंकररावजी चव्हाण साहेबांचे पुत्र म्हणुन दोन मुख्यमंत्री झालेले, राज्य काँग्रेस मधील एकमेव घराणे (परीवार) आहे.

अशोकराव यांनी राजीनामा देता क्षणी कार्यकुशल नेते देवेंद्र फडणवीस राणा भिमदेवी थाटांत “आगे आगे देखो.. होता है क्या”… म्हणत आपल्या कार्यकुशलतेस पृष्टी देण्याची संधी सोडत नाहीत हे राजकीय विकृतीचेच दर्शन असल्याची टिका ही काँग्रेस ने केली.

एरव्ही “भ्रष्टाचार, परीवार वादाच्या” नांवे गळा काढणाऱ्या भाजप नेत्यांना अशोकराव चव्हाणांची “जनतेशी जुळलेली नाळ, जनाधार” यांचा साक्षात्कार होतो व जेथून भाजप निवडुन येऊ शकत नाही तेथुन चव्हाणांच्या मदतीने भाजप विजयी होण्याची दिवास्वप्ने पडु लागतात, ही भाजपची अगतिकता व लाचारीच् स्पष्ट करते.

Pimpri : विश्वासार्हता, पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकांना उत्तम सेवा पुरवणारी बँक हीच प्रेरणा बँकेची ओळख – अजित पवार

काँग्रेसने ऊभारलेल्या ‘स्वातंत्र्योत्तर भारतात’ संविधानिक, लोकशाही व न्यायालयीन व्यवस्थेमुळेच् 500 वर्षां पासुनच्या वादातीत ‘रामजन्म भूमी’च्या जागेबाबत ‘वादी-प्रतिवादींना’ बाजू मांडण्याची संधी मिळाली, न्यायालयाचे दरवाजे खुले होऊन ‘कायदेशीर न्याय-निवाडा’ होऊन ‘न्यायालयाने’ त्यावर निकाल ही दिला व राम मंदीरा सोबत मस्जिद बांधणे बाबत ही निर्देश दिले हे सर्व ‘देशास स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच’ झाले याचे ही उचित स्मरण राम मंदीरांचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या व ‘स्वातंत्र्योत्तर भारतात’ सत्तेची फळे चाखणाऱ्या मात्र स्वातंत्र्य संग्रामात योगदान नसलेल्या भाजप’ने लक्षात ठेवले पाहिजे.

तरी देखील काँग्रेस ने ऊभारलेल्या स्वतंत्र लोकशाही देशात, भाजपने दाखवलेली स्वस्ताई व अच्छे दिनची स्वप्ने, बेरोजगारी, काळा पैसा, महागाई विरोधी दिलेली आश्वासने, शेतकऱ्यांच्या समस्या व पुर्वीच्या सरकारचा कथित भ्रष्टाचार या मुद्दयांवर निवडुन दिले होते. मात्र, भाजप या निष्कर्षांवर चोखपणे काम करून सिध्द ठरू शकली नाही, उलट देश 3 पट कर्ज बाजारी झाला व दुप्पट महागाई झाली, राष्ट्रीय संपत्तीची70 वर्षात सर्वाधिक लुट झाली.

सत्ता काळातील अपयशांची जाणीव झाल्यानेच भाजप नेते वाट्टेल त्या थराला जात असून विरोधी पक्षांचे नेते पळवण्याचे व प्रति पक्षांचे अस्तित्व कमी करण्याचे अनैतिक प्रयत्न करू लागले असुन सैरभैर झाले असले तरी देखील, “स्वविश्वासार्हता टिकवणे, राजकीय विचारधारा, तत्वांची बांधिलकी व नैतिक मुल्यांची जोपासना करणे हेच आदर्श राजकीय नेत्याचे ऊदाहरण असल्याची” पुस्ती ही गोपाळ तिवारी यांनी जोडली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.