Pune : प्रसिद्ध गायक किशोर कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

एमपीसी न्यूज –  स्वामी समर्थ व गजानन महाराज ( Pune) यांच्यावरील रचनांनी घराघरात पोहचलेले प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी यांचे वयाच्या 60 व्या वर्षी अल्पषा आजाराने पुण्यात काल (सोमवारी) निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

Pimpri : उपजिल्हाधिकारी रामदास जगताप सुसंस्कृत आदर्श अधिकारी – निलेश लंके

नादातूनी या नाद निर्मितो, श्रीराम जय राम जय जय राम’ या नाम गजरातून कुलकर्णी यांचा आवाज सर्वांच्याच परिचयाचा झाला होता. स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यावरील रचना कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केल्या होत्या.

कवी ग्रेस यांच्या कविता स्वरबद्ध करून त्यावर आधारित ‘ग्रेसफुल’ या कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली होती. गेली काही वर्षे ते नवोदितांना संगीत मार्गदर्शन करत असत.

पं. यशवंतबुवा मराठे आणि महंमद हुसेन खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतलेल्या किशोर कुलकर्णी यांना पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून सुगम संगीताचे मार्गदर्शन मिळाले. लता मंगेशकर यांचा त्यांना प्रदीर्घ सहवास लाभला.

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’ आणि ‘शिवकल्याण राजा’ या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. तर, त्यांच्या रचनांवर आधारित ‘दिन तैसी रजनी’ या कार्यक्रमाचे ते संगीतकार आणि निर्माते ( Pune) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.