Pune : महिला कैद्यांनी लुटला गरबा-दांडियाचा आनंद; येरवडा मध्यवर्ती महिला कारागृहातील कार्यक्रम

श्री महालक्ष्मी मंदिराच्या नवरात्र उत्सवाची सांगता आणि दिवाळीचा प्रारंभ

एमपीसी न्यूज – प्रतिकूल परिस्थिती किंवा अन्य कारणांनी त्यांच्याकडून गुन्हा घडला़, त्यामुळे झालेल्या शिक्षेला आता त्या सामोऱ्या जात आहेत़. नकळतपणे ताण-तणावही त्यांच्या वाट्याला येत आहे़. त्यांचा ताण-तणाव दूर व्हावा आणि सामान्यांप्रमाणे त्यांनीही सण-उत्सव साजरे करावे, या उद्देशाने कारागृहात राहणाऱ्या महिला कैद्यांसाठी नुकताच एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला़. यामध्ये त्यांनी चक्क दांडिया-गरब्याचा आनंद लुटला़ त्यासाठी त्यांनी दोन महिने कारागृहातच प्रशिक्षण घेत पूर्वतयारी केली होती़, हे विशेष.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्यावतीने श्री़ बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट व येरवडा मध्यवर्ती कारागृहातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

_MPC_DIR_MPU_II

ओम गं: गणपतये नम:’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरूवात झाली़ ‘पंखिडा’, ‘छो गाडा तारा’ या गाण्यावर महिला कैद्यांनी दांडियाचा फेर धरला़ यावेळी महिला कैद्यांचा पदन्यास आश्चर्यचकित करणारा होता़ त्यांच्या हातातील टिपऱ्याचा एकाचवेळी होणारा आवाज वातावरण चैतन्य निर्माण करत होता़ व्यावसायिक नृत्यांगना असल्याप्रमाणे त्यांची पावले एका तालात पडत होती़.

या महिला स्वत:ला विसरून नृत्याशी एकरूप झाल्या होत्या़ त्यामुळे त्यांच्यातील सामूहिक ठेका उपस्थित अधिकारी, त्यांच्या मार्गदर्शक यांनाही अचंबित करणारा ठरला़. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली़. कार्यक्रमासाठी महिला कैद्यांनी दोन महिने रोज दोन तास सराव केला़. गेल्या पंधरा दिवसांपासून त्या मेकअप, ड्रेपरी, मेहंदी यांची तयारी करत होत्या़ त्यांना नृत्यांगना प्रिया डिसा यांनी नृत्यासाठी मार्गदर्शन केले़.

यावेळी सुनील रामानंद म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच असा उपक्रम घेण्यात आला़. त्यामागे अनेक उद्देश होते़ सर्वप्रथम महिला कैद्यांचा ताण-तणाव दूर करणे, त्यांच्यातील नैराश्य दूर करून त्यांचा उत्साह वाढविणे हा प्रमुख उद्देश होता़. समाजात आपले काय स्थान आहे आणि ते कसे उंचावता येईल, त्यांच्यामध्ये कौटुंबिक भावना निर्माण व्हावी, यासाठी या कार्यक्रमातून प्रयत्न करण्यात आला़. तसेच सामूहिक सहभागातून शिस्तही त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे़ यामध्ये कारागृहातील शंभर महिला कैद्यांनी सहभाग घेतला़.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.