Pune : अभिव्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपाच्या गुंडांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी – अरविंद शिंदे

एमपीसी न्यूज – ‘निर्भय बनो’ या सभेत लोकशाही पध्दतीने (Pune)आपले विचार मांडण्यासाठी आलेल्या जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व जेष्ठ कायदेतज्ञ आसिम सरोदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, महिला यांच्यावर भ्याड हल्ला केला.

 

त्यांच्या गाडीचे आतोनात नुकसान करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व एक प्रकारे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या भाजपाचा पुणे शहर गुंड अध्यक्ष धीरज घाटे व त्याच्या सोबत आलेल्या सर्व हिस्ट्री सिटर गुंडांवर ३०७ कलम अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली.

 

निमित्त होते परवा वागळे व इतर सामाजिक कार्यकर्ते हे दांडेकर पूल येथील साने गरूजी हॉल या ठिकाणी लोकांनी आयोजित केलेल्या निर्भय बनो या सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यात आले असता त्यांच्यावरती भा.ज.पा. चा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे व त्यांच्या हिस्ट्री सिटीर गुंडांनी भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध करण्यासाठी आज अरोरा टॉवस, कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाजवळ काँगेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अरविंद शिंदे बोलत होते.

 

U19Wc : क्रिकेट विश्वचषक विजयाची भारताला प्रतिक्षाच; ऑस्ट्रेलियाकडून 79 धावांनी पराभव
आंदोलनापूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष अरविंद शिंदे व ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरूवात करण्यात आली.

यावेळी ‘गुंड शाही व झुंडशाहीच्या’ विरोधात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अविनाश बागवे, ॲड. राजश्री अडसुळ यांची भाषणे झाली.

या आंदोलन प्रसंगी माजी महापौर रजनी त्रिभुवन, माजी नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, मुख्तार शेख, संगीता पवार, नीता रजपूत, राजेंद्र भुतडा, विजय खळदकर, द. स. पोळेकर, सुनिल शिंदे, वाल्मिक जगताप, दिलीप तुपे, आसिफ शेख, हेमंत राजभोज, अक्षय माने, अजित जाधव, रमेश सोनकांबळे प्रियंका रणपिसे, समिर शेख, संजय कवडे, राज अंबिके, मारूती माने, अभिजीत महामुनी, सीमा सावंत, शिवानी माने, रजिया बल्लारी, सोनिया ओव्हाळ, उषा राजगुरू, सुंदरा ओव्हाळ, हेरॉल्ड मॅसी, राज घेलोत, दिपक ओव्हाळ, लतेंद्र भिंगारे, अविनाश अडसूळ, आशितोष शिंदे, नलिनी दोरगे, पपीता सोनवणे, देविदास लोणकर, सचिन भोसले आदींसह असंख्य काँग्रेसजण सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भवानी ब्लॉकचे अध्यक्ष सुजित यादव यांनी केले तर आभार पुणे कॅन्टॉन्मेंट ब्लॉकचे अध्यक्ष आसिफ शेख यांनी मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.