Pune: आवक घटल्याने बटाटे महाग,  फ्लॉवर, शेवगा स्वस्त 

एमपीसी न्यूज : – आवक घटल्याने बटाटे महाग झाले तर, कोथिंबीर, (Pune)मेथी, चाकवत, करडई, पुदिना, अंबाडी, मुळा, राजगिरा, चुका, पालक आणि हरभरा या भाज्या स्वस्त झाल्या आहेत, अशी माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. 

घाऊक बाजारात बटाट्याची आवक ‌घटल्याने बटाट्याच्या दरांत ( Pune)वाढ झाली आहे. मागील आठवड्यातही परराज्यांतून बटाट्याची आवक कमी झाली होती.

गेल्या आठवड्यात महागलेला फ्लॉवर आणि शेवगा स्वस्त झाला आहे. अन्य फळभाज्यांचे आणि पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. पुणे बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक घटली आहे. गुलटेकडीतील मार्केट यार्डात राज्यातून आणि परराज्यांतून सुमारे90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. ‘मागील आठवड्यात 100ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती.

आग्रा, इंदूर, पुणे विभागातून मिळून  20ते 25 ट्रक बटाट्याची आवक झाली.

कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे आठ ते 10 टेम्पो, कर्नाटक, गुजरातमधून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून शेवगा चार ते पाच टेम्पो, राजस्थानातून गाजर 11 ते 12 टेम्पो, कर्नाटकातून घेवडा तीन ते चार टेम्पो, भुईमुगाच्या शेंगा दोन टेम्पो, मध्य प्रदेश, राजस्थान येथून मटार 10 ते 13ट्रक, कर्नाटक येथून पावटा तीन ते चार टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची सहा ते सात टेम्पोंची आवक झाली.

स्थानिक भागांतून सातारी आल्याची 600 ते 700गोण्या, भेंडी पाच ते सहा टेम्पो, गवार पाच ते सहा टेम्पो, टोमॅटो दहा ते बारा हजार क्रेट, हिरवी मिरची पाच ते सहा टेम्पो, काकडी दहा ते बारा टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12टेम्पो, कोबी पाच ते सहा टेम्पो, शिमला मिरची आठ ते दहा टेम्पो, पावटा चार ते पाच टेम्पो, तांबडा भोपळा 10ते 12 टेम्पो, शेवगा दोन ते तीन टेम्पो, घेवडा पाच ते सहा टेम्पो, कांदा 100 ट्रक अशी आवक झाली आहे.

 

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share