Pune : क्षेत्रीय कार्यालयस्तरावर आढावा घेऊन कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची दिशा ठरविणार : धीरज घाटे

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरांवर दि. १३ ते १६ मे या कालावधीत संपूर्ण आढावा घेउन पुढील प्रभावी उपाययोजनांची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मनपाचे सभागृह नेते धिरज घाटे यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिका कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता विविध उपाय योजना यशस्वीरीत्या राबवित आहे. तथापि, रोज प्राप्त होणारी आकडेवारी कशी कमी करता येईल. तसेच पुणे शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने क्षेत्रीय कार्यालय परिसरातील संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे.

त्यानुसार आज हडपसर मुंढवा व नगररस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करुन आढावा घेण्यात आला. यामध्ये आजपर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजना, मनुष्यबळ, मास्क, सॅनिटायजेर, किट्स, निर्जंतुकीकरण, रेशन वितरण, विलगिकरणाच्या व रुग्णालयातील व्यवस्था, उपाययोजनांच्या दृष्टीने पुढे नियोजनाकरिता दिशा ठरविणे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

स्थानिक प्रभाग समिती अध्यक्ष व सभासद, संबंधित अधिकारी यांच्या सुचना विचारात घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे धिरज घाटे म्हणाले.

हडपसर येथील बैठकीप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रभाग समिती अध्यक्षा पूजा कोद्रे, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेवक मारुती तुपे, योगेश ससाणे, नगरसेविका हेमलता मगर, उज्वला जंगले, संजय घुले, गणेश ढोरे व सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप, क्षेत्रीय अधिकारी सुनील यादव, विविध विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

नगररस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयात बैठकीप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रभाग समिती अध्यक्षा मुक्ता जगताप, श्वेता गलांडे- खेसे, सुनीता गलांडे, राहुल भंडारे, महेंद्र पठारे, सुमन पठारे, शीतल शिंदे, अन्य सभासद तसेच सहमहापालिका आयुक्त विजय दहीभाते, क्षेत्रीय अधिकारी राजेश बनकर, क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.