Pune : विमाननगर येथील बेकर्स कंपनीमध्ये आग

एमपीसी न्यूज- विमाननगर येथील बेकर्स कंपनीमध्ये आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास आग लागून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माहिती मिळताच पुणे अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आली असून आगीचे कारण अद्याप समजले नाही. 

विमाननगर येथील बेकर्स कंपनीच्या तळमजल्यावर असलेल्या वर्कशॉपमध्ये आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास आग लागून येथील यंत्रसामुग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या ठिकाणी काही प्रमाणात रसायनांचा वापर केला जातो. घटनेची माहिती मिळताच येरवडा आणि पुणे स्टेशन अग्निशमन केंद्रातून एकेक गाडी तसेच भवानी पेठ मुख्यालयातून पाण्याचा एक टँकर रवाना करण्यात आला. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.  मात्र या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही अशी माहिती अग्निशमन अधिकारी विजय भिलारे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.