Moshi : विसर्जन मिरवणूकी दरम्यान पाण्याच्या टाकीत पडून  पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – एका बाजूला विसर्जन मिरवणुकीची धामधुम सुरु (Moshi ) असताना अर्धवट उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीच्या झाकणातून पडून पाच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना काल (गुरुवारी) मोशी येथील बोऱ्हाडेवस्ती येथील एका सोसायटी जवळ रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली.  

अर्णव आशिष पाटील (वय 5, रा. मित्रा सोसायटी, मोशी) असे मयत मुलाचे नाव आहे. अर्णव हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत.

Pune : पावसामुळे विसर्जना दिवशी शहरातील रस्ते देखील गेले पाण्यात

मिळालेल्या माहितीनुसार, अर्णव हा त्याच्या आई -बाबांसोबत सोसायटीच्या (Moshi ) गणपतीची विसर्जन मिरवणूक पहायला गेला होता. यावेळी बरेचजण पाण्याच्या टाकीच्या झाकणावर उभा राहून मिरवणूक पहात होते.

यावेळी अर्णव देखील तिथेच उभा होता. मिरवणूक पहाण्यात मग्न असलेल्या त्याच्या आई बाबांना अर्णव दिसला नाही. तासभर शोधला तरी तो सापडला नाही.

यावेळी त्यांनी शोधा-शोध सुरु केली. शेवटी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो टाकीच्या झाकणावर उभा असलेला दिसला. यावेळी सर्वजण टाकीजवळ गेले असता टाकीचे झाकण अर्धवट खुले होते.

Pune Visarjan 2023 : पुण्यात नो कोयता, फक्त हवी शांतता; देखाव्यातून जनजागृती करत पोलिसांना सलाम

त्यावेळी त्यांच्या मनात शंका आली आणि दुर्दैवाने ही शंका खरी ठरली. एका नजरचुकीने अर्णव याचा बुडून मृत्यू झाला होता.

विसर्जनापूर्वी प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असतानाही केवळ एका नजरचुकीने चिमुकल्याला आपला जिव गमवावा लागला. त्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात (Moshi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.