Pune : सलग दुसऱ्या दिवशी पुण्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस

एमपीसी न्यूज – ढगांच्या गडगडाटासह दुसऱ्या दिवशीही पुणे शहरातील काही भागांत जोरदार अवकाळी पाऊस झाला. शुक्रवारी दुपारी 4 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उकाड्याने आणि लोकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला.

पुणे शहरातील शिवाजीनागर, प्रभात रोड, डेक्कन, रास्ता पेठ, वारजे – माळवाडी, पर्वती, सहकारनगर, शिवणे भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पुणेकरांना गारवा मिळाला. मे महिन्याची आज सुरुवात झाली असताना कमालीचा उकाडा जाणवत आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी पाऊस झाल्याने लॉकडाऊनच्या काळात घरात असलेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. कोरोनाच्या संकटामुळे 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सलग दोन दिवस होत असलेल्या या पावसात पुणेकरांना भिजता आले नाही. पावसाच्या सोबतीला सोसाट्याचा वारा असल्याने बच्चे कंपनीने खिडक्या, बाल्कनीतूनच पावसाचा आनंद लुटला. जोरात पाऊस येत असल्याने मातीला चांगलाच सुगंध सुटला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.