Pune : मनसे घडविणार भावी नगरसेवक -वसंत मोरे; मिशन 2022 अंतर्गत 17 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे प्रत्यक्षात कामकाज कसे चालते? ड्रेनेज, पाणी, रस्त्यांची समस्या कशी सोडवावी, सर्वसाधारण सभेत शेवटपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक कसे असते?, याची प्रत्यक्ष माहिती मनसेचे नगरसेवक, पदाधिकारी देणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दि. 17 नोव्हेंबर रोजी मिशन 2022 अंतर्गत ‘मी नगरसेवक होणारच’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पंडित भीमसेन सभागृह वसंतराव बागुल उद्यान पर्वती या ठिकाणी हे शिबिर होणार आहे, अशी माहिती मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेवक साईनाथ बाबर, नेते ऍड. गणेश सातपुते, माजी नगरसेविका रुपाली पाटील उपस्थित होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हे शिबीर आयोजित केले आहे. पुढील 2 वर्षे त्यामध्ये सातत्य असेल.

माजी नगरसेवक राजेंद्र वागस्कार, ऍड. किशोर शिंदे, रणजित शिरोळे, योगेश खैरे, संतोष पाटील, जयराज लांडगे यांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमात सर्व प्रशिक्षणार्थींना पुणे महापालिकेची कार्यपद्धती, नागरवस्ती विभागाचे कामकाज, सर्व विभागांची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून 97 पदाधिकाऱ्यांनी या शिबिराचे फॉर्म भरले आहेत. हे शिबिर सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.