Pune : सरकारने शाळांमध्ये किमान एक तरी कला अनिवार्य करावी – मनोज वाजपेयी

एमपीसी न्यूज़ – फिरोदिया करंडकाच्या बक्षिस समारंभात (Pune) प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांनी आपल्या मनोगतात म्हंटले, की सरकारने शाळांमध्ये किमान एक तरी कला अनिवार्य करावी, ज्यामुळे कलांना पुरक असे वातावरण निर्माण होईल.
पुण्यात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी फिरोदिया करंडकाचे आयोजन करण्यात आले. फिरोदिया करंडक ही विविध गुणदर्शन करणारी स्पर्धा आहे. यामध्ये अनेक नामांकित महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
यंदा प्रथम पारितोषिक बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने पटकवला, तर स.प. महाविद्यालयाला द्वितीय पारितोषिक मिळाले.
Pune : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नि: शुल्क मार्गदर्शक शिबीर
प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी हे बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोबतच दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, सावनी रवींद्र, आशिष कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या फिरोदियातल्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले, की मी विद्यार्थी दशेत असताना (Pune) नाटक स्पर्धा होत नव्हत्या, फक्त वक्तृत्व स्पर्धा होत असत. पण वयाचा नवव्या वर्षापासूनच मला अभिनेता व्हायचे होते. तेव्हा बिहारच्या छोट्या गावातून दिल्ली, मुंबईचा प्रवास सुरु झाला. आजच्या काळातली मुले नशीबवान आहेत. त्यांच्यात लोकांसमोर कला सादर करण्याची धमकसुद्धा आहे.