Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वगळून ‘त्या’ गाव किल्ल्यांच्या देखभालीसाठी सरकार धोरण ठरविणार -जयकुमार रावळ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले तसेच पुरातत्व विभागाकडील असणारे किल्ले वगळून विशेष गाव किल्ल्यांच्या देखभालीसाठी सरकार धोरण ठरविणार आहे, असे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी आज सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज, हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येण्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत, याला पूर्णविराम मिळाला असल्याचे समजत आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी सांगितले कि, महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वगळून जे विशेष गाव किल्ले आहेत. त्या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी सरकार धोरण ठरविणार आहे. ज्याप्रमाणे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पॉण्डिचेरी, गोवा आदी राज्यांनी किल्ल्यांबाबत धोरण ठरविले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात विशेष गाव किल्ले आहेत. अशा किल्ल्यांचा विचार करून त्यांची देखभाल, दुरुस्ती करण्याचा विचार सरकार करत आहे.

जे गाव किल्ले आहेत, त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्रात अशा किल्ल्यासाठी योग्य धोरण ठरविण्यात येणार आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले तसेच पुरातत्व विभागाकडील असणारे किल्ले सोडून जे लोक पुढाकार घेऊन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोणत्या पद्धतीने प्रयन्त करण्यात येणार आहेत. याचा विचार करून किल्ल्याचे संवर्धन करण्यात येणार आहे.

मात्र, हे करताना किल्ल्याचे ऐतिहासिक पावित्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयन्तही केला जाणार आहे. तसेहच कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, जे पाहिले जाणार आहे, असेही राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.