Dighi : माहेरहून गाडी व दागिने आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेराहून गाडी व दागिने आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच तिला केलेल्या अमानुष मारहाणीमुळे तिचा गर्भपात झाला. या प्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अभय कुलकर्णी (वय 33), अंजली कुलकर्णी (वय 58), अतुल कुलकर्णी (वय 35), रमा कुलकर्णी (वय 33), अर्चना कुलकर्णी (वय 39), प्रशांत लुम्हे (वय 45, रा.अमूल्यम सोसायटी, डुडुळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता व अभय हे पती-पत्नी आहेत. अभय यांनी इतर आरोपींशी संगनमत करून फिर्यादी यांना माहेराहून गाडी व सोन्याचे दागिने आणण्याची मागणी केली. फिर्यादी यांनी नकार दिला असता त्यांना शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच फिर्यादी या गर्भवती असताना त्यांना मारहाण केल्याने त्यांचा गर्भपात झाला. फिर्यादी यांची नणंद व तिच्या पतीने तू नवऱ्यासोबत घटस्फोट घे, नाहीतर तुझे काहीपण करू, अशी धमकी देत फिर्यादी यांच्या आईला आणि बहिणीला मारहाण केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.