Pune : गोविंद घोळवे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

एमपीसी न्यूज – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे (Pune ) राज्य संघटक, श्री क्षेत्र भगवान गडाचे सचिव, ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे 15 मिनिटे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.

शरद पवार पुणे दौ-यावर आहेत. पुण्यातील कार्यालयात घोळवे यांनी पवार यांची भेट घेतली. राज्यातील बदललेले राजकारण, आगामी राजकारणावर चर्चा झाली.

Ravet : पोलीस मार्शलच्या अंगावर धावून जात झटापट करणाऱ्याला अटक

याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली. घोळवे हे मराठवाड्यातील असल्याने पवार यांनी त्यांच्याकडून मराठवाड्यातील बदललेल्या राजकारणाचीही माहिती घेतली. मराठवाड्यातील राजकारणावरही दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. 15 मिनिटे दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मराठवाड्यातील (Pune) राजकारणावर शरद पवार यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचे घोळवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.