Ravet : पोलीस मार्शलच्या अंगावर धावून जात झटापट करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस मार्शलला (Ravet) एकाने अंगावर धावून येत झटापट केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार गुरुवारी (दि.10) रात्री रावेत येथे घडला.

याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून विकास किसना राम बीश्नोई (वय 22, रा. मुळशी) याला अटक केली आहे.

PCMC : आता शिपाई होणार हवालदार, जमादार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना एकजण गाडीमधून गॅस टाक्यांची चोरी करत असल्याची खबर मिळाली. पोलीस घटनस्थळी पोहचले असता आरोपी हा थेट पोलिसांच्या अंगावर धावून आला.

त्याने पोलिसांशी झटापट केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.