PCMC : आता शिपाई होणार हवालदार, जमादार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) शिपायांना हवालदार व जमादार या पदांवर पदोन्नती दिली जाणार असून ही पदे आकृती बंधात निर्माण केली जाणार आहेत. त्याबाबतचा प्रस्तावाला प्रशासकांच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे.

महापालिकेच्या सेवा व सेवांचे वर्गीकरण नियमामध्ये शिपाई पदाचा पदोन्नतीचा गट ड वर्गात आहे. त्या कर्मचार्‍यांनी पदोन्नतीनुसार वेतन वाढीचा नियम पूर्वीप्रमाणे लागू करण्याबाबत आयुक्तांकडे वारंवार विनंती केली होती. त्यानुसार, पालिका आस्थापनेवरील शिपाई या पदास पदोन्नतीसाठी हवालदार व जमादार या पदाची नवनिर्मिती करण्यात आली आहे.

मजूर या पदास मुकादम व आरोग्य सहाय्यक या पदांची वेतनश्रेणी देण्यात येत होती. मात्र, सेवा प्रवेश नियम 2020 मंजूर झाल्यानंतर मुकादम व आरोग्य सहाय्यक ही पदे सार्वजनिक आरोग्य सेवा वर्गामध्ये मंजूर करण्यात आली आहेत. सेवा प्रवेश नियमांमध्ये मजूर हे एकाकी पद मंजूर असल्याने त्या पदास पदोन्नती साखळी तयार करण्यात आली आहे.

Dighi : घरात घुसून महिलेशी गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

शिपाई व मजूर पदाच्या पदोन्नतील नियमातील या बदलास राज्य शासनाच्या (PCMC) नगर विकास विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सामान्य प्रशासन विभागाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यास आयुक्तांनी सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे. शासनाच्या मान्यतेनंतर शिपाई व मजुरांना पदोन्नती मिळून वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.