Pune : इंधनदराचा भडका सुरूच ! आज पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

एमपीसी न्यूज- पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होण्याचे सत्र थांबता थांबत नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. पुण्यात मंगळवारी पेट्रोल 10 पैशांनी तर डिझेल 9 पैशांनी महागले.

पुण्यात सोमवारी पेट्रोलचा भाव 89.28 तर डिझेलचा भाव 76.97 पैसे होता. स्पीड किंवा पॉवर पेट्रोल 92.08 पैसे दराने मिळत होते. आज मंगळवारी पेट्रोल 89.38 पैसे तर डिझेल 77.06 पैसे दराने विकले जात आहे. स्पीड किंवा पॉवर पेट्रोलचा भाव 92.17 वर पोचला आहे.  त्यामुळे येत्या काही दिवसातच पेट्रोलचा भाव शंभरीचा टप्पा पार करतो की काय अशी भीती सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.