Pune : इंधन दरवाढ सुरूच ; पेट्रोल 89.20 तर डिझेल 76.94
एमपीसी न्यूज – आंदोलनानंतरही इंधन दरवाढ सुरूच असून पेट्रोलचे आजचे दर 89.20 तर डिझेल 76.94 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. घरोघरी गौरी गणपतीचा उत्सव साजरा होत आहे. तसेच मुस्लीम बांधवांचे मोहरम देखील याच काळात आहे. त्यामुळे सण उत्सवामध्ये अशा प्रकारच्या इंधन दरवाढीमुळे जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.