Pune : ‘प्रमोटिंग टॉलरन्स इन डिजिटल एज’ विषयावरील ऑनलाईन संवाद सत्राला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान मधील अमेरिकन वकिलातीच्या वतीने ‘प्रमोटिंग टॉलरन्स इन डिजिटल एज’ विषयावर ऑनलाईन संवाद सत्र नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. बाळकृष्ण दामले (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एज्युकेशन मल्टिमीडिया रिसर्च सेंटर’ चे प्राध्यापक) यांनी ‘सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा सहिष्णुता वाढविण्यासाठी उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन केले. साबीर सय्यद (मुंबई) यांनी ‘हिंसकता आणि कट्टरतेला तोंड देण्यासाठी मोबाईल ऍप तंत्रज्ञानाचा उपयोग’ या विषयावर मार्गदर्शन केले .

अमेरिकन वकिलात मुंबईतील सहाय्यक सांस्कृतिक कार्य अधिकारी जोनाथन हवांग यांनी प्रास्ताविक केले. डेबोस्मिता यांनी समारोप केला .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.