Pune : काश्मीर ट्रीपच्या नावाखाली ट्रॅव्हल कंपनीने केली सव्वालाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – काश्मीर ट्रीपच्या नावाखाली ट्रॅव्हल कंपनीने सव्वालाखांची फसवणूक केल्याने शुक्रवार पेठ येथील एका ट्रॅव्हल कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 मे ते 21 जुलै या दरम्यान हा गुन्हा घडला आहे.

याप्रकरणी रमेश कुलकर्णी (वय 50, रा.मुद्रे, रायगड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील विशाल टूर अँड ट्रॅव्हल या ट्रॅव्हल कंपनीत फिर्यादीच्या पत्नीने काश्मीर ट्रीपची चौकशी करून 25 हजारांचे ट्रीपचे पॅकेज बुक करून 5 जणांकडून एकूण 1 लाख 25 हजार रुपये घेतले. यामध्ये त्यांना विमानाने जाण्यायेण्याची तिकिटे, राहण्याची तसेच जेवण व फिरणे या सुविधा देण्यात येणार होत्या. परंतु कुलकर्णी यांना त्या ट्रॅव्हल कंपनीने कोणत्याही प्रकारची काश्मीरच्या ट्रीपची विमानाची तिकिटे बुक न करता त्यांची सव्वालाखांची फसवणूक केली.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.