Pune : जनसेवा बँकेच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी उद्घाटन

एमपीसे न्यूज- जनसेवा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन येत्या रविवारी (10 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. नानासाहेब जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, संचालक राजेंद्र वालेकर, संदीप सारडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी उपस्थित होते.
हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथे बँकेच्या मुख्य कार्यालयाची नवीन वास्तू इको ग्रीन बिल्डींग या संकल्पनेतून बांधण्यात आली असून एकूण सात मजल्यांची ही इमारत अत्यंत प्रशस्त झाली आहे. स्वमालकीच्या या इमारतीमध्ये मुख्य कार्यालयाचे सर्व विभाग व डाटा सेंटर राहणार असल्याचेही जगताप यांनी यावेळी सांगितले.

जनसेवा सहकारी बँकेची स्थापना हडपसर येथे 1972 साली झाली आणि तेव्हापासून बँकेने सतत अग्रस्थान पटकावले आहे. आता पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्युल्ड बँकांमध्ये प्रथम क्रमांकाची ही बँक आहे. बँकेच्या एकूण 30 शाखा असून एकूण व्यवसाय रुपये तीन हजार कोटींपेक्षा अधिक आहे. बँकेची स्वत:ची 25 ए. टी. एम. सेंटर्स आहेत. सर्व अत्याधिनिक बँकींग सेवासुविधा बँकेमार्फत दिल्या जातात असे श्री. जोशी यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.