Pune : जीवनसाथी डॉट कॉमवरची ओळख पडली महागात; तरुणींना 23 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख (Pune) झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यानंतर प्रदेशातून महागड्या गिफ्ट वस्तू पाठवल्याचे सांगत दोन तरुणांना तब्बल 23 लाख रुपयांनी गंडा घातला. चंदन नगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तरुणींनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

29 वर्षाच्या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तिची जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर विराट पटेल नामक व्यक्तीसोबत ओळख झाली होती. विराट पटेल यांनी आपण परदेशात नोकरी करत असल्याचे सांगितले. तसेच पीडित तरुणी सोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. दरम्यान काही दिवसानंतर त्याने या तरुणीला परदेशातून तिच्यासाठी महागडे गिफ्ट पाठवण्याची त्यांने सांगितले. मात्र या गिफ्ट वस्तू दिल्ली एअरपोर्टवर कस्टम विभागाने अडवण्याचे तिला सांगण्यात आले.

सुरवातीला इम्पोर्ट चार्जेस म्हणून तिच्याकडून 32 हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर इन्कम टॅक्स, डिलिव्हरी टॅक्स चार्ज अशी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. तसेच विराट पटेल याने आपल्याला चेक इंडियन रुपीमध्ये कन्व्हर्ट करुन घेण्यासाठी पैसे हवे असल्याचे सांगून तिच्याकडून आणखी पैसे मागितले.

अशा प्रकारे तिने विराट पटेलच्या वेगवेगळ्या अकाउंटवर तब्बल 13 लाख रुपये भरले. मात्र त्यानंतर आणखी पैशाची मागणी होत असल्याने तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मात्र या तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.

दरम्यान चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात राहणाऱ्या (Pune ) आणखी एका तरुणीची अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली. या तरुणीलाही गिफ्ट पाठवल्याचे सांगून तिच्याकडून तब्बल नऊ लाख तीस हजार रुपये उकळण्यात आले. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Talegaon : तोतया आयएएस तायडेचा आणखी एक गुन्हा उघड; सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी घेतले 42 लाख रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.