Pune : आयपीएचतर्फे शुक्रवारी परफेक्ट – OCD (मंत्रचळ) शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच)यांच्या वतीने शुक्रवारी (दि. 23) परफेक्ट – OCD (मंत्रचळ) – शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी परफेक्ट- OCD (मंत्रचळ) शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट दिवाळीच्या सुट्टीमुळे शुक्रवारी (दि 23) नोव्हेंबर रोजी जमणार आहे.

त्यानुसार शुक्रवारी (दि. 23) रोजी जमणाऱ्या गटासाठी चर्चेचा व मार्गदर्शनाचा विषय OCD – Belief System’ म्हणजेच ‘OCD (मंत्रचळ) व विचारपद्धती असणार आहे. या गटातला सहभाग विनामूल्य आहे.

हा कार्यक्रम इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, प्लॉट क्रमांक 4, यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वेनगर ,पुणे येथे संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.