Chinchwad : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

एमपीसी न्यूज – दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस खंडणी, दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही घटना चिंचवड येथे घडली.

महावीर प्रवीण लुणावत (वय 22, रा. गोखले आळी शेजारी, मोरया पार्क, चिंचवड) असे अटक केलेल्या दरोडेखोराचे नाव आहे.

खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात 2016 मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी लुणावत हा चिंचवडगाव येथील भाजी मंडई परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शैलेश सुर्वे आणि आशिष बोटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास सापळा रचून अटक केली. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.