Pune : ज्येष्ठ पत्रकार विजय मारूती मोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ पत्रकार विजय मारूती मोरे (वय 58) यांचे आज, शनिवारी पहाटे २ वाजता अल्पशा आजाराने कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

विजय मोरे मागील अनेक वर्षांपासून पोलीस आणि गुन्हेगारी विश्वातील वार्तांकन करत होते. मोरे यांनी पुणे आणि मुंबई येथील अनेक दैनिकांमध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून काम केले. विजय मोरे अनेक वर्षे वडगाव मावळ येथे रहायला होते. आज दुपारी 12 वाजता वडगाव मावळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीत सदस्यम्हणून काम पहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.