Pune : केटीएम-3 इंडिया-इंडोनेशिया ब्यूटी,फॅशन स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज- नील ग्रुप ऑफ कंपनीज, रेवा हाऊस ऑफ स्पोर्ट्स आणि पुणे फिल्म कास्टिंगच्या वतीने केटीएम-3 इंडिया-इंडोनेशिया ब्यूटी,फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवोदित बाल कलाकार , युवक, युवती आणि गृहिणी यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेची निवडचाचणी पुणे, मुंबई, दिल्ली, नगर, नाशिक, गुवाहाटी, अहमदाबाद, इंदोर या शहरांमध्ये 8 जून पासून सुरू होणार आहे. या फेरीतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी बाली-इंडोंनेशिया येथील कुटा बीच वर जुलै महिन्यात होणार आहे.

स्पर्धेचे परीक्षण सिनेअभिनेते राहुल रॉय आणि भारतीय कुस्तीगीर खेळाडू मनीष मान हे करणार आहेत या स्पर्धेचे ग्रुमिंग आणि ट्रेनिंग सेशन नील कांबळे आणि फॅशन कोरिओग्राफर आणि डिझायनर विशाल कपूर करणार आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि मिसेस इंडिया रूपाली सावंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन नील ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डिरेक्टर नील कांबळे, रेवा हाऊस ऑफ स्पोर्ट्स चे मॅनेजिंग डिरेक्टर शिवाजी साळुंके, पुणे फिल्म कास्टिंगचे मॅनेजिंग डिरेक्टर सचिन वाडकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.