Pune : सुनील देवधर यांच्या कार्यक्रमाकडे स्थानिक नेत्यांनी फिरवली पाठ

एमपीसी न्यूज – पुणे लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Pune)आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या स्थानिक नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांच्या कार्यक्रमाकडे मात्र पाठ फिरवली आहे.

त्याची राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा होत आहे. एकीकडे मुळीक आणि मोहोळ यांच्या कार्यक्रमाला भाजप नेते हजेरी लावताना दिसत आहेत तर दुसरीकडे देवधर मात्र एकाकी पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

Pune: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देऊया -डॉ. वजाहत मिर्झा 

श्रीराम जन्मभूमीसाठी सुरू असलेल्या तब्बल500 वर्षांच्या संघर्षाची (Pune)यशस्वी पूर्तता करून श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य अशा राम मंदिराची उभारणी करण्यात आली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी ‘नमो पुणे अभिवादन’ या भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. याचं नियोजन भाजपचे लोकसभा इच्छुक असलेले सुनील देवधर यांनी केले होते.

मात्र, या आयोजनापासून स्थानिक भाजप नेत्यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे खमंग चर्चांना उत आला आहे. मुळीक, मोहोळ आणि देवधर यांच्या नावाची पुणे लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू आहे. भाजपचा उमेदवार पुण्यातीलच असावा, त्यासाठी नेते मंडळींनी गैरहजेरी लावल्याची कुजबुज सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.