Pune: लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देऊया -डॉ. वजाहत मिर्झा 

एमपीसी न्यूज – ”धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणजे आपला काँग्रेस पक्ष आहे. ज्या प्रकारे आपले सर्वांचे (Pune)नेते राहुल गांधी, नानाभाऊ पटोले हे पक्ष संघटनेसाठी काम करीत आहेत.

 

त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करूया आणि येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देऊया. देशाचे संविधान वाचेल तर लोकशाही टिकेल.

 

काही लोक संविधान मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे, पण आपण त्यांचा हा प्रयत्न हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वांनी मिळूण हानून पाडू व लोकशाही प्रधान देशाचे संविधान टिकवूयात’’, असे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा म्हणाले. 

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक काँग्रेस भवन, पुणे येथे झाली.बैठकीचे आयोजन पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष समिर मोहिद्दीन शेखयांनी केले.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे(Pune) यांनी विचार मांडले. अल्पसंख्याक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन केले की, येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येणे गरजेचे आहे.

 

PCMC : महापालिका अर्धवेळ 65 तज्ज्ञ डॉक्टर घेणार

त्यासाठी खबरदारी घ्या, अल्पसंख्याक मतांमध्ये फुट पाडणाऱ्या पक्षांपासून सावध रहा. येत्या निवडणूकांमध्ये अल्पसंख्याकांना योग्य त्या ठिकाणी उमेदवारी दिल्या जातील, असं त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले.

 

यानंतर अल्पसंख्यांक विभागाची नव नियुक्त शहर कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिप्तीताई चवधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, महाराष्ट्र प्रदेश NSUl अध्यक्ष आमीर शेख, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, अजित दरेकर, रफिक शेख, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, उस्मान तांबोळी, नुरद्दिन सोमजी, प्रदेश पदाधिकारी मंजुर शेख, यासिन शेख, नवनीतजी गांधी, अल्ताफ चौहाण, जावेद निलगर, सुलतान खान, जाकीर पठाण, हसन कुरैशी, असिफ शेख, फैयाज शेख, आशा पटोळे, प्रियादर्शनी जेम्स मनी, राजु भाई इनामदार, ॲड. आदिबा सय्यद,  व इतर पदाधिकारी सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड अल्पसंख्यांक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांनी केले, तर आभार राजु भाई इनामदार यांनी मानले.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.