Pune: महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनकडून राज्य सरकारचे आभार व्यक्त

Pune: Maharashtra Salon and Parlor Association expresses gratitude to the state government

एमपीसी न्यूज – लॉकडाऊननंतर महाराष्ट्र शासनाने सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष व नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

केशकर्तनालये व सलून सुरू करण्यास अखेर परवानगी मिळाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात सलून व्यावसायिकांमध्ये तसेच ग्राहकांमध्येही आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. लवकरच महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे शिष्टमंडळ सोमनाथ काशिद यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून आभार व्यक्त करून अन्य मागण्यांसाठी निवेदन देणार आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, प्रवीण दरेकर आदी नेत्यांनी सलून व्यावसायिकांसाठी आवाज उठवला. त्यामुळे त्यांचे देखील नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी आभार मानले आहेत.

अन्य मागण्यांसाठी नाभिक समाजाचा लढा हा कायम ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी दिली आहे

प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. 

  • प्रत्येक सलून व्यावसायिकास एक लाख रुपये रोख अर्थिक मदत द्यावी.
  • आत्महत्या केलेल्या सलून व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची त्वरित अर्थिक मदत द्यावी.
  • सलून व्यावसाय हा सेवा क्षेत्रात मोडत असल्याने 50 लाखाचा विमा राज्य सरकारने जाहीर करावा तसेच संरक्षण किट सरकारने द्यावे.
  • सलून व्यावसायिकांचे चार महिन्यांचे दुकान भाडे व लाईट बिल माफ करण्यात यावे तसा GR काढून राज्य सरकारने आदेश काढावा.
  • केशकला बोर्ड कार्यान्वित करून नाभिक समाजाच्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड करून अर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.