Pune : पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी महेश आल्हाट

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी महेश आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी नियुक्तीचे पत्र दिले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचे काम करणे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, बारामती लोकसभा मतदारसंघांचे खासदार सुप्रिया सुळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष करण कोकणे, बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना बळकट करण्यासाठी कट्टीबद्ध राहणार असल्याचे महेश आल्हाट यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.