Vadgaon Maval : प्राधिकरण रोटरी क्लबतर्फे नेसावे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाच पंखे

एमपीसी न्यूज- हॅपी स्कूल संकल्पनेअंतर्गत प्राधिकरण रोटरी क्लब यांचेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेसावे येथील इ 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 5 पंखे देण्यात आले.

यावेळी क्लबचे अध्यक्ष बहार शहा, अभिषेक जांभूळकर, नेसावे गावचे माजी सरपंच अंकुश शिरसट, शालेय समितीचे अध्यक्ष अनिल शिरसट, युवा नेतृत्व विजयराव शिरसट, संदीप शिरसट, मच्छिंद्र गायकवाड, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन नवनाथ शिरसट यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.