Pune: मतदान केल्याची शाई दाखवा, रक्तगट व मधुमेह तपासणी मोफत करा

गोखलेनगरमधील आकांक्षा फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज- मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करुन देशाला चांगले आणि स्थिर सरकार द्यावे, या करिता अनेक सामाजिक व सेवाभावी संस्था कार्यरत असतात. पुण्यातील गोखलेनगर परिसरातील आकांक्षा फाऊंडेशनने देखील मतदानाच्या दिवशी अभिनव उपक्रम आयोजित केला असून मतदान केल्याची बोटावरील शाई दाखवा आणि रक्तगट व मधुमेह तपासणी विनामूल्य करा. हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त मतदारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. मंगळवार, दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत वैष्णवी डायग्नोस्टिक सेंटर, गोखलेनगर येथे हा उपक्रम दिवसभर सुरु राहणार आहे.
  • तरी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनच्या डॉ.अपर्णा गोसावी आणि डॉ.आकांक्षा गोसावी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.