Pune: मराठा समाज सर्वेक्षण 90 टक्के काम पूर्ण

एमपीसी न्यूज – मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याची मुदत(Pune) शुक्रवारी संपली. राज्यात सुमारे90टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. ज्या जिल्ह्यातील सर्वेक्षणाचे काम प्रलंबित असेल, तेथे अपवादात्मक परिस्थितीत सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्याचे संकेत राज्य मागासवर्ग आयोगाने दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वेक्षणाचा सर्वंकष अहवाल राज्य सरकारकडे दिला जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवडयात लागू होण्याची शक्यता गृहित धरून सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यास आयोगाने नकार दिला. त्यानुसार शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत सर्वेक्षणाचे काम करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी तातडीने पूर्ण करण्यासाठी (Pune)राज्य शासनाने जोरदार हालचाली सूरू केल्या आहेत. आरक्षण मिळविण्यासाठी लवकरच राज्य शासनाचे अधिवेशन होणार आहे. त्यासाठी युद्धपातळीवर मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे.
राज्यातील 36जिल्हे, 27 महानगरपालिका आणि सात कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात हे सर्वेक्षण करण्यात आले. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी प्रगणक, पर्यवेक्षकांवर सोपवण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातील एकूण एक लाख 25 हजारपेक्षा अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
मराठा समाजाचे मागासलेपण जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये विविध प्रकारची माहिती संकलीत करण्यात आली. त्यासाठी पुण्यातील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने प्रश्नावली तयार केली होती. सुरुवातीला सर्वेक्षण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.