Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख व दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करा -प्रमोद नाना भानगिरे 

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राचे विभाग (Pune)प्रमुख व दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. 
दिनांक 2 फेब्रुवारी 2024 ला ललित कला केंद्र येथील ओपन थेटर मध्ये काही नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. यातील तिसरे नाटके प्रभू श्री रामचंद्र व सीतामाता यांच्यावर आधारित होते. संबंधित नाटकामध्ये माता सीतेचे पात्र स्टेजवरून अश्लील भाषेत शिव्या देत होते. त्याचबरोबर विद्यापीठासारख्या शिक्षणाच्या प्रांगणामध्ये सार्वजनिक ठिकाणी व एका जाहीर नाटकाच्या प्रयोगामध्ये सीता मातेचे पात्र सिगरेट ओढत होते.

नंतर सीता मातेचे पात्र प्रभू श्रीरामचंद्र यांना राखी सावंत नावाने (Pune)हाक मारते. या सर्व विषयांमध्ये हिंदू देवी देवता यांचा अपमान झालेला आहे. यावेळी सामान्य विद्यार्थी व कार्यकर्ते या नाटकाच्या प्रसंगांबद्दल शांततेच्या मार्गाने आवाज उठवत असताना ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी नाटकाबद्दल आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना कुदळ फावडे व दांडूक यांनी मारहाण केली. ही सर्व घटना निंदनीय आहे. याचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.

 

संबंधित ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्राविण भोळे, आक्षेपार्ह नाटक लिहिणारे व सादर करणारे विद्यार्थी आणि ललित कला केंद्राचे मारहाण करणारे विद्यार्थी यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. त्याचबरोबर सर्व दोषींना तात्काळ निलंबित करायलाच हवी, असेही प्रमोद नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.