Alandi: तीन विश्वस्त रिक्त पदे भरायची असल्याने इच्छुक व्यक्तींना अर्ज करण्याचे आळंदी देवस्थानचे आवाहन

एमपीसी न्यूज – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,(Alandi)आळंदी देवस्थान विश्वस्त मंडळातील तीन रिक्त पदे भरावयाची आहेत.इच्छुक व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या व्यक्ती या पदाकरिता नसणार पात्र:-
1)जन्माने व धर्माने हिंदू नसलेली व्यक्ती.
2)एकवीस(21) वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती तसेच ज्या व्यक्तीचे वय सत्तर(70) वर्षापेक्षा जास्त आहे अशी व्यक्ती.
3)मानसिक दृष्ट्या कमकुवत /दुर्बल/अस्वस्थ असलेली व्यक्ती
4)आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर असलेली व्यक्ती.
5)संस्थानच्या हिता विरुद्ध कार्य करणारी व्यक्ती.

6)पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये रहिवास नसलेली व्यक्ती
7)ज्या व्यक्तीस नैतिक अधिपतनाच्या संबंधाने शिक्षा झाली आहे अशी व्यक्ती.
8)संस्थानच्या नियमाप्रमाणे संस्थानचा अनुवंशिक नोकर,वारसदार,सेवेकरी किंवा संस्थानकडून ज्या व्यक्तीस वेतन/मानधन मिळते किंवा मिळण्यास पात्र आहे अशी व्यक्ती
याबाबत दि.1 फेब्रुवारी रोजी देवस्थान प्रमुख विश्वस्त   अ‍ॅड राजेंद्र उमाप नोटीस जाहीर केली असून जाहीर केलेल्या जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पंधरा (15) दिवसाच्या आत श्री ज्ञानेश्वर महाराज कमिटी,आळंदी येथील आळंदी कार्यालयात करावयाचे आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.