Alandi :श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत माऊलींच्या मूर्तीच्या स्थापनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज -माऊलींच्या नावाने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील (Alandi)माऊलींच्या मूर्तीकडे पाहून विद्यार्थ्यांमध्ये विविध सत् गुण रुजावेत तसेच त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी विद्यालयातील माऊली बागेत माऊलींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
आज माऊलींच्या मूर्तीच्या स्थापनेचा दुसरा वर्धापन दिन. यानिमित्ताने विद्यालयात माऊलींची पूजा, हरिपाठ, भजनाचे आयोजन करण्यात आले.
तसेच राजा शिवछत्रपती विद्यालय डुडुळगाव येथे काळाची व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ ची उपक्रमास प्रारंभ झाला. त्याचबरोबर ज्ञानगंगा स्कूल मध्ये हरिपाठ पाठांतरास सुरुवात झाली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर ढमाले, ज्ञानगंगा स्कूलचे अध्यक्ष विजय गुळवे, ह. भ. प. पंढरीनाथ महाराज रोकडे, ह. भ. प. ज्ञानेश्वरीताई रोकडे, प्राचार्य दीपक मुंगसे, प्रदीप काळे, राजा शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल पानसरे, अनिता गावडे, श्रीरंग पवार, ह. भ. प. हनुमंत महाराज घाडगे, विलास वाघमारे, धनाजी काळे, राजेंद्र जाधव, कैलास आव्हाळे रत्नेश नारखेडे, सर्जेराव बरकडे, प्रदीप तळेकर, सुरेश चोधरी, युवराज हतागळे, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी अजित वडगावकर, प्रकाश काळे, अतुल पानसरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती होऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ विचारांविषयी आवड निर्माण व्हावी करिता शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.