Pune: माय कॉलेज खोज या बोगस कंपनीच्या गैरव्यवहार प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक

एमपीसी न्यूज – विमाननगरमधील फिनिक्स सिटी मॉल या (Pune)ठिकाणी असलेल्या माय कॉलेज खोज या बोगस कंपनीद्वारे हजारो तरुणांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आलेले आहे.
काल विमाननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी(Pune) संबंधित कंपनीवर धाड टाकून हे कार्यालय सील केले आहे. त्याबाबत रीतसर तक्रार विमाननगर पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल असून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने या विषयास वाचा फोडण्यात आली.

खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच निष्पाप विद्यार्थ्यांची फसवणूक ही कंपनी करत होती. या कंपनीचे मालक दांपत्य हे फरार असून कंपनी व्यवस्थापकाला काल विमान नगर पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी दोषींवरती कारवाई व्हावी, याकरिता तत्कालीन पोलीस आयुक्त  रितेश कुमार यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस आणण्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहराचे अध्यक्ष करण सतीश शेठ मिसाळ, दुष्यंत मोहोळ, ओंकार केदारी आदी पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.