Pune – सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची कॅनॉलच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज- सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने कॅनॉलच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बिबवेवाडी येथील भैरोबानाला कॅनॉल येथे घडली.

करिष्मा अमित चौघुले (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी करिष्मा हिची आई रंजना सरोदे (वय 43, रा.बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. करिष्मा ही तिच्या सासरी नांदत असताना, सासरी एक महिला मागील 11 वर्षांपासून करिष्मावर संशय घेऊन तिला वारंवार शिवीगाळ तसेच मारहाण करून तिचा छळ करत असे. त्यामुळे या महिलेच्या त्रासाला कंटाळून करिश्माने घरातून निघून जाऊन भैरोबानाला कॅनॉल इथे जाऊन वाहत्या पाण्यात उडी मारून स्वतःला संपवले.

पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.