Maval : मावळ परिसरात गारांचा पाऊस 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि. 16) दुपारी मुसळधार पाऊस पडला. वडगाव आणि तळेगाव परिसरात गारांचा पाऊस पडला. (Maval) दुपारपर्यंत उकाड्याने हैराण झालेल्या मावळ वासियांना दुपारनंतर मात्र वातावरणातील गारठा अनुभवता आला.

 

सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. पुढील काही दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी सकाळी कडक ऊन पडले. मात्र दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. अवघ्या तासाभरात वातावरण बदलले आणि तीन वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत पडलेल्या कडक उन्हामुळे मावळवासिय हैराण झाले होते. मुसळधार पावसाने उकाड्याचे रूपांतर गारठ्यात केले.

 

Pimpri : मित्राला मारहाण केल्याच्या संशयावरून दोघांना बेदम मारहाण

 

गारांचा पाऊस पडू लागल्याने लहान मुलांनी गारा जमा करण्याचा आनंद घेतला. तळेगाव दाभाडे येथील आठवडे बाजारात भाजीविक्रेत्यांची धावपळ उडाली. (Maval) वडगाव मावळ येथे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पडताच पावसाने हजेरी लावली. यामुळे वऱ्हाडी मंडळींची पुरती धावपळ झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.