Pimpri : खासगी बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडत असलेल्या पादचारी (Pimpri) वृद्ध महिलेला खासगी बसने धडक दिली. यामध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री दहा वाजताच्या सुमारास वल्लभनगर येथे पुणे मुंबई महामार्गावर घडली.

दुर्गाबाई कुंटाप्पा टाकळे (वय 70, रा. नेहरूनगर पिंपरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रोहित सुभाष टाकळे (वय 24, रा. चिखली) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार एमएच 11/बीएल 9644 क्रमांकाच्या बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maval : मावळ परिसरात गारांचा पाऊस 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आजी दुर्गाबाई या शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जुना पुणे मुंबई महामार्गावर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या बसने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुर्गाबाई यांचा मृत्यू झाला. (Pimpri) अपघात झाल्यानंतर बस चालक घटनास्थळी बस उभी करून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.