Pune : पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालकपदी श्री.रणजित अशोकराव तावरे

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचा संचालक पदाचा निकाल जाहीर (Pune)करण्यात आला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचा संचालक पदी श्री.रणजित अशोकराव तावरे यांची निवड झाली.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार (Pune)यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालक पदाचा राजीनामादिला होता.

Pimpri Chinchwad : शालेय वयात चांगल्या संस्कारांची नितांत गरज असते- डॉ.दिलीप गरुड

या रिक्त झालेल्या जागेवर बारामती तालुक्यातून ‘अ’ वर्ग मतदार संघामधून श्री.रणजित अशोकराव तावरे (रा.माळेगाव बु. ता.बारामती जि.पुणे) यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेच्या संचालक पदी निवड झाली.

मा.ना.अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून जिल्हा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये विद्यमान चेअरमन श्री.दिगंबर दुर्गाडे यांनी तावरेंचं नांव सुचवले. सूचक म्हणून श्री.दत्तात्रयमामा भरणे तर यांस अनुमोदन श्री.रमेशआप्पा थोरात यांनी दिले व बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करणेत आले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.