Chinchwad : सेवानिवृत्त ज्येष्ठांची वणवण थांबणार; पोस्टमन देणार हयातीचे दाखले

एमपीसी न्यूज – केंद्र आणि राज्य शासनाच्या नोकरीतून सेवानिवृत्त (Chinchwad)झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी निवृत्ती वेतन मिळण्यासाठी हयातीचा दाखला द्यावा लागतो. यासाठी त्यांची डिसेंबर महिन्यात वणवण होते. आता ही  वणवण थांबणार असून पोस्टमन सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना हयातीचे प्रमाणपत्र देणार आहेत. पुणे ग्रामीण डाक विभागाकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाकडे हयातीचा दाखला वेळेत जमा करणे (Chinchwad)बंधनकारक असते. दाखला जमा न केल्यास निवृत्तीवेतन मिळणे बंद होते. यासाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचारी अधिकचे पैसे मोजून खासगी संगणक केंद्रावरून दाखला तयार करून घेतात. इंटरनेट आणि इतर तांत्रिक अडचणी आल्यास ज्येष्ठ नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी शहरात जाऊन ही प्रक्रिया करावी लागते.

Chinchwad : दिवाळीला गावी जाताय! मग चोरट्यांची तुमच्या घरात दिवाळी होऊ नये याची काळजी घ्या
विशेषतः डिसेंबर महिन्यात ज्येष्ठांची ही वणवण सुरु असते. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे. टपाल कर्मचाऱ्यांना डिव्हाईस देण्यात आले आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक आणि अंगठ्याचे ठसे घेऊन जागेवरच त्यांना हयातीचा दाखला दिला जाणार आहे. कुठेही न जाता जागेवर दाखला मिळणार असल्याने ज्येष्ठांची दाखल्यासाठीची वणवण थांबणार आहे.

पुणे ग्रामीणचे डाकघर अधीक्षक बी पी एरंडे म्हणाले, “सरकारी निवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या हयातीचा दाखला पेन्शन विभागाकडे डिसेंबर पर्यंत जमा करावा लागतो. बँक अथवा नागरी सुविधा केंद्रात त्यासाठी स्वतः जावे लागते. विविध शारीरिक व्याधींमुळे अनेकांना प्रत्यक्ष जाणे जमत नाही. त्यामुळे टपाल विभागाने पुढाकार घेऊन ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.