Pune: ज्योती जोशी हिने पटकाविला मिसेस ब्युटिफुल सोलचा किताब

एमपीसी न्यूज – पुण्याच्या ज्योती जोशी हिने दिल्ली येथे  झालेल्या स्पर्धेत मिसेस इंडिया ब्युटिक्वीन 2019 च्या मिसेस  ब्युटिफुल सोल इंडियाच्या किताबावर नाव कोरल आहे. अंतिम फेरीतील स्पर्धकांमध्ये सौंदर्य आणि बुध्दिमत्तेच्या कौशल्यावर तिने हा किताब पटकाविला.

दिल्ली येथे नुकतीच मिसेस इंडिया ब्युटिक्वीन 2019 ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण 60 स्पर्धकांचा समावेश होता. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतून स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत शारिरिक सौंदर्यासोबतच हजरबाबीपणा व्यक्तिमत्व, धाडस, कपड्यांची निवड या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर ही निवड केली जाते. या सर्व कसोटी पार करुन ज्योतीने मिसेस  ब्युटिफुल सोल इंडियाचा किताब आपल्या नावावर केला.
  • ज्योतीने स्पर्धेतील यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला दिले आहे. या स्पर्धेसाठी ज्योतीने खूप मेहनत घेतली असल्याचे ती सांगते. तिला फेब्रुवारीमध्येच मिसेस महाराष्ट्र ग्लोबलमध्ये मिसेस परफेक्ट हा किताब पटकाविला होता. ज्योती ही व्यवसायाने एचआर असून ती योगा व फिटनेसचे तंत्र अवगत करत आहे. या स्पर्धेत अभिनेत्री महिमा चौधरी व कुणाल कपूर या दोघांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.