Pune: शहरातील 250 मोडकळीस आलेले वाडे व धोकादायक इमारतींना महापालिकेची नोटीस

Pune: Municipal Corporation issues notice to 250 dilapidated houses and dangerous buildings in the city

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील 250 वाडे आणि इमारती धोकादायक आहेत. महापालिकेच्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे. या इमारत आणि वाडामालकांना महापालिकेतर्फे पावसाळ्याच्या तोंडावर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. घरांत पाणी घुसून नागरिकांचे होते नव्हते ते सर्व वाहून गेले होते. तर, काही नागरिकांचा पावसामुळे बळीही गेला होता. शहरात सर्वत्र पावसाने हाहाकार माजविला होता. आशा दुर्घटना यावर्षी घडू नये, यासाठी म्हपालिकेने सतर्कता घेतली आहे. 24 बाय 7 आपत्ती व्यवस्थापन कक्ष आतापासूनच सज्ज ठेवण्यात आला आहे.

धोकादायक मिळकती काढण्याचे आदेश नोटीसमध्ये दिले आहेत. तर, आतापर्यंत 6 धोकादायक वाडे पाडण्यात आले आहेत. पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. या परिस्थितीत 15 मिळकती धोकादायक आहेत. त्या लवकरच पाडण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

शहरातील धोकादायक असलेल्या या 250 वाड्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्या ठिकाणी लोक ‘जीव मुठीत’ घेऊन राहतात. पावसाळा आला की हा प्रश्न निर्माण होतो. या वाड्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी हा प्रश्न लावून धरला आहे. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्यामध्ये वाडा पडून दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिकेतर्फे घरमलकांना नोटीसा बाजावण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.